भरधाव दुचाकीच्या धडकेत महिला शेतकरी गंभीर जखमी

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कानळदा रोडवरील फुपनगरी फाट्याजवळ शेतातून घरी जात असलेल्या एका महिलेला समोरून येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने हाताने डोक्याला गंभीर दुखापत केल्याची घटना शनिवारी १९ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता घडली. या संदर्भात रविवारी २० एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला.

कोकिळा लालचंद सोनवणे वय-५५, रा. कानळदा ता. जळगाव या महिला शनिवारी १९ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता शेतातून काम करून घरी कानळदा येथे पायी जात असतांना जळगावकडून चोपडाकडे जाणारी दुचाकी क्रमांक (एमएच १९ इबी ६९०६ ) याने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात कोकिळा सोनवणे या महिला यांच्या हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान त्यांना जखमी अवस्थेत जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या संदर्भात कोकिळा सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी २० एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस नाईक मनीषा उमराणे ह्या करीत आहे.

Protected Content