गांजाचा नशा करणाऱ्या दोघांवर कारवाई


भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील कुस्ती मैदानात चिलममध्ये गांजा भरून नशा करणाऱ्या दोन तरूणावर भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील कुस्ती मैदानात रात्रीच्या सुमारास काही तरूण हे चिलममध्ये गांजा भरून नशा करत असल्याची गोपनिय माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीसांना मिळाली. त्यानुसार पथकाने सोमवारी १२ मे रोजी रात्री ८ वाजता तौफिक शेख अमिर शेख वय २१ रा. मुस्लिम कॉलनी,भुसावळ आणि शेख जुबेर शेख अजगर वय ३१ रा. नुराणी मशिद, भुसावळ या दोघांवर कारवाई केली. त्यांच्याकडून नशा करणारे गांजा आणि साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी दोघांवर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सोपान पाटील हे करीत आहे.