जळगावात गांजाचा नशा करणाऱ्या दोघांवर कारवाई

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आर.एल. चौफुलीवरील महादेव मंदीराजवळ बेकायदेशीपणे गांजाचा नशा करणाऱ्या दोन जणांवर एमआयडीसी पोलीसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील आर एल चौफुली परिसरात बेकायदेशीरपणे दोन गांचाचा नशा करत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली, त्यानुसार पोलीसांनी मंगळवार १३ मे रोजी दुपारी कारवाई करत संशयित आरोपी जोतमल तपेश्वर राठाडे वय २५ आणि वरूण रमेश गोयल वय २१ दोन्ही रा. सुप्रिम कॉलनी जळगाव यांच्यावर कारवाई केली. त्यांच्याकडून गांजा पिण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास पोलीस नाईक पंकज पाटील हे करीत आहे.

Protected Content