जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विषारी औषध घेतलेल्या अयोध्या नगरातील ३२ वर्षीय तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी १३ मे रोजी दुपारी १ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. योगेश लिलाधर वाघोदे वय ३२ रा. अयोध्या नगर, जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील अयोध्या नगरात योगेश वाघोदे हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याने राहत्या घरात विषारी औषध सेवने केले. त्यामुळे त्याला तातडीने जळगाव जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना मंगळवारी १३ मे रोजी दुपारी १ वाजता मृत्यू झाला आहे. विषारी औषध घेण्याचे कारण समोर आलेले नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ स्वप्निल पाटील हे करीत आहे.