वाळू वाहतूक करणारा ट्रकसह मदत करणाऱ्या कारवर कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आव्हाणे शिवारातील फाट्याजवळ बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक सह त्याला मदत करणारे कारचालक यांच्यावर जळगाव तालुका पोलीसांनी बुधवारी १३ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास कारवाई करण्यात आली. यावेळी पोलीसांनी दोनही वाहने जप्त करून तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्याच्या हद्दीतील आव्हाणे शिवारातील फाट्याजवळून ट्रकमधून बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक शर्मा यांच्यासह पथकाने बुधवार १३ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता कारवाई केली. यावेळी वाळूने भरलेला ट्रक क्रमांक (एमएच १९ सीवाय ७५२४) पकडला. त्यावेळी कार क्रमांक (एमएच ०३ बीएच ३६१८) मधील चालक श्रीराम ज्ञानेश्वर चौधरी रा. आव्हाण ता.जि.जळगाव हा देखील त्याला वाहतूक करतांना आढळून आला. दरम्यान, दोन्ही वाहनावरील चालकांनी पोलीसांना पाहताच दोन्ही वाहने जागेवर सोडून पसार झाले. दरम्यान, पोलीसांनी दोन्ही वाहने जप्त केली असून तालुका पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकवरील अज्ञात चालकमालक आणि कारमधील चालक श्रीराम ज्ञानेश्वर चौधरी यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन सायकर हे करीत आहे.

Protected Content