मारहाण करून खून केल्याप्रकरणी पाच जणांना जन्मठेप

court

जळगाव प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथील एकाला राहण्याच्या वादातून पाच जणांनी मारहाण करून विहिरीत फेकून खून करण्यात आला होता. याप्रकरण जामनेर पोलीसात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा न्यायालयातील न्या. आर.जे.कटारिया यांच्या न्यायालयात कामकाज झाले असता पाचही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

याबाबत हकीकत अशी की, जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथील अनिल कडू खंडारे व त्यांची पत्नी सुनिता अनिल खंडारे हे कुटुंबिय मोल मजूरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. 6 नोव्हेबर 2012 रोजी ज्या वाड्यात राहत होते त्या वाड्यातील आरोपी आनंदा उर्फ अण्णा समाधान जारे, किशोर पंढरी सुरवाडे, सागर वसंत साबळे, गौतम भिमराव जारे आणि अनिल मधुकर लोखंडे सर्व रा. पळासखेडा ता. जामनेर यांनी घराजवळील विहिरीजवळ येवून ‘आमच्या वाड्यात का रहायला आला’ असे सांगत पाच जणांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. अनिल खंडारे याचे हातपाय पकडून चापटा बुक्क्यांनी, लाथांनी पोटावर, छातीवर, तोंडावर मारहाण केली आणि बाजूला असलेल्या विहिरीत फेकून जिवे ठार केले होते. याबाबत 7 नोव्हेंबर 2012 रोजी मयताची पत्नी सुनिता खंडारे यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीसात गुरंनं 155/2012 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासाधिकारी व्ही.आर. शित्रे यांनी पुरावाजन्य परिस्थिती आणि गुन्हतील कामास सुरूवात केली. आज जिल्हा न्यायालयातील न्या. आर.जे.कटारिया यांच्या न्यायालयात कामकाजात मयताची पत्नी अनिला खंडारे, भाऊ वसंत खंडारे, वहिनी लताबाई सुनिला खंडारे आणि डॉ. रविंद्र कडू पाटील, तपासाधिकारी विश्वास रामचंद्र शित्रे आणि अशोक उतेकर यांच्या साक्षी महत्वपुर्ण ठरल्या. न्यायालयाने प्रत्यक्षदर्शी आणि शवविच्छेदन च्या अहवालावरून खून केल्याप्रकरणी आरोपी आनंदा उर्फ अण्णा समाधान जारे, किशोर पंढरी सुरवाडे, सागर वसंत साबळे, गौतम भिमराव जारे आणि अनिल मधुकर लोखंडे या पाच जणांना कलम 302 आणि 149 मध्ये जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी हजार रूपये दंड, दंड न भरल्यास तीन महिन्याची साधी कैद, कलम 143 मध्ये सहा महिन्याचा सश्रम कारावास व प्रत्येकी 100 रूपये दंड, दंड न भरल्यास 15 दिवसाची साधा कारावास अशी शिक्षा देण्यात आली. सरकारपक्षा तर्फे ॲड. निलेश चौधरी यांनी कामकाज पाहिले, सरतपासणी ही सरकारी वकील ॲड. एस.जी. काबरा यांनी केली. आरोपीतर्फे ॲड. बनकर आणि ॲड. दर्जी यांनी काम पाहिले.

Add Comment

Protected Content