घरफोडी प्रकरणात तीन संशयित आरोपींना अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  अनुराग स्टेट बँक कॉलनीमधील आनंद भंडारी यांचे बंद घरफोडून २२ हजाराचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी ३ जणांना शनिवारी अटक केली आहे. त्यांच्याजवळून लॅपटॉप, साउड सिस्टीम आणि हार्डडीस्क जप्त करण्यात आले आहे.   भरत सपकाळे (वय-२१), रोहित संजय लोखंडे (वय-१९) व विक्की महेंद्र कोळी (वय-२१, तिन्ही रा.समतानगर) असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

 

रामानंदनगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आनंद भंडारी हे बाहेरगावी गेल्यानंतर त्यांचे बंद घर चोरट्यांनी फोडून लॅपटॉप, हार्डडिस्क, साउंड सिस्टीम, वायफाय डोंगल, पेनड्राईव्ह चोरून नेले होते. याप्रकरणी ११ फेब्रुवारी रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा पोलिस कर्मचारी सुशिल चौधरी यांना यांना घरफोडीतील चोरटे हे समतानगरातील असल्याची माहिती मिळाली. रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी इतरा पोलिस सहका-यांच्या मदतीने भरत, रोहित आणि विक्की यांना अटक केली. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी पोलिसांना लॅपटॉप, साउंड सिस्टीम आणि हार्डडिस्क काढून दिले आहे. चौथ्या साथीदाराचा शोध सुरू आहे.

Protected Content