फुले मार्केटजवळून दुचाकीची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील फुले मार्केट परिसरातील दत्त मंदीराजवळून एका किरणा दुकानदाराची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मंगळवारी १२ डिसेंबर रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी बुधवारी १३ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश बाबुराव जाधव वय-५० रा. रामनगर, जळगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. किराणा दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. मंगळवारी १२ डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ते त्यांची दुचाकी क्रमांक एमएच १९ एयू १०७१ ने जळगाव शहरातील फुले मार्केट येथील दत्त मंदीराजवळ कामाच्या निमित्ताने आलेले होते. त्यावेळी त्यांनी दत्त मंदीराच्या जवळ त्यांची दुचाकी पार्क करून लावली होती. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी पार्कींगला लावलेली दुचाकी चोरून नेली. काम आटोपून सुरेश जाधव हे दुचाकीजवळ आले असता त्यांनी दुचाकी जागेवर मिळून आली नाही. सर्वत्र दुचाकीचा शोध घेतला मात्र दुचाकी त्यांना मिळून आली नाही अखेर बुधवारी १३ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता जळगाव शहर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील  तपास पोहेकॉ प्रफुल्ल धांडे हे करीत आहे.

Protected Content