वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई; चालकावर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील खेडी बुद्रुक परिसरातून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या डंपरवर महसूल विभागाने कारवाई केली आहे. याप्रकरणी डंपरचालकाविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील खेडी बुद्रुक परिसरातून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती जळगाव तहसिल कार्यालयातील नायब तहसीलदार राहूल वाघ यांनी मिळाली. त्यानुसार मंगळवारी ४ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता महसूल पथक गस्तीवर असतना खेडी बुद्रुक परिसरात डंपर (एमएच १९ बीएम ४४४३) वाळू वाहतूक करतांना आढळून आला. डंपर चालकावर धडक कारवाई केली. याप्रकरणी नायब तहसीलदार राहूल वाघ यांच्या फिर्यादीवरून डंपर चालक ज्ञानेश्वर प्रल्हाद कोळी यांच्यावर जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दिनेश पाटील करीत आहे.

 

Protected Content