शिवक्रांतीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा जागर (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | शिवसाहित्य प्रसार अभियानांतर्गत शिव व्याख्याते  व प्रचारक अनिल पाटील हे मालेगावातून उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले आहेत. आज त्यांनी शिवतीर्थ मैदानाजवळ शिवसाहित्य विक्रीसाठी ठेवले होते. त्यांना नागरिकांचा  भरभरून प्रतिसाद लाभत आहे.

 

मागील सात ते आठ वर्षापासून शिवक्रांती अभियानांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र व विचार हे जनमानसात पोहचविण्याचे काम केले जात आहे. यात शहरी भागासह ग्रामीण भागातील तरुणांना हे साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत शिवजी महाराजांच्या विलोभनीय मुर्त्या आणि आकर्षक साहित्याचे प्रदर्शन व विक्री जळगाव येथील शिवतीर्थ मैदानाजवळ दि. ५ ते ७ डिसेंबर या कालावधीत होणार आहे असे अनिल पाटील यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना सांगितले. शिवक्रांती अभियानांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांचे साहित्यासह त्यांच्या पॉलीमार्बलच्या मुर्त्याचे प्रचार प्रसार केला जात आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश महापुरुषांच्या विचाराचा वारसा शहरासह खेडोपाडी पोहचविणे हा असल्याचे श्री. पाटील यांनी स्पष्ट केले. लग्न समारंभ, वाढदिवसी महाराजांचे पुस्तक किवा मूर्ती भेट द्यावे जेणे करून त्यांना यातून प्रेरणा घेता येईल असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे. जिल्ह्यातील एरंडोल, पारोळा, रावेर, अमळनेर येथे भेट दिली असून पुढे जामनेर तालुक्यात जाणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/610407843497548

 

Protected Content