के.सी.ई. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा स्तुप्त उपक्रम

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  प्रथम वर्ष अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी राज प्राथमिक माध्यमिक विद्यालय मेहरूण येथील विद्यालयास भेट देऊन विद्यार्थ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाचा शिक्षणात कसा वापर करावा याचे प्रात्यशिक दाखविण्यात आले.

 

यामध्ये विडिओ क्लास, चित्रकला, गणिती समीकरण मांडणी याचा समावेश होता तसेच गरजु विदयार्थ्यांना वही , पेन या शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. विद्यलयातील ७२ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला . उपक्रमासाठी प्रा.  किरण पाटील यांनी मार्गदर्शन केले. स्तुप्त उपक्रमा बद्दल राज प्राथमिक माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य प्रा. चंद्रकांत पाटील के. सी. ई. अभियांत्रिकी महाविद्यलाचे प्राचार्य डॉ . संजय सुगंधी , उपप्राचार्य प्रा. संजय दहाड , शैक्षणिक अधिष्टाथा डॉ. प्रज्ञा विखार यांनी अभिनंदन केले .

Protected Content