वृत्तपत्रे राष्ट्रीय कर्तव्ये व सामाजिक जबाबदारीचे भान देतात : सिद्धार्थ नेतकर

 

जळगाव, प्रतिनिधी ।  वृत्तपत्रे  राष्ट्रीय कर्तव्ये व सामाजिक जबाबदारीचे भान देतात  असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते तथा निवृत माध्यमिक उपशिक्षणाधिकारी .सिद्धार्थ नेतकर यांनी केले. 

 

कै.किसन पुना नाले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जनमत प्रतिष्ठान,श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान,निसर्ग व पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ यांच्या सौजन्याने सामाजिक कार्यकर्ते महेश ठाकूर (अभियंता ) यांच्या नेतृत्वाने जळगाव येथे वाटिका आश्रम परिसरातील मयूर हौसिंग सोसायटी येथे शुक्रवार दि.२६ मार्च २०२१ रोजी मोफत वृत्तपत्र वाचनालयाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते तथा निवृत्त उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मयूर सोसायटीचे चेअरमन भालचंद्र ठाकूर होते तर  प्रमुख अतिथी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे जिल्हा सहसचिव विजय लुल्हे, विलास दुसाने, माजी सैनिक आर. टी. पाटील, एम. झेड. सरदार, नितीन मनुरे, किरण पाटील  ,अभय दुसाने, अनिता दुसाने, संगिता ठाकरे, किर्ती ठाकूर, मानवसेवा शाळेचे कलाशिक्षक सुनिल दाभाडे, महिला अन्याय अत्याचार समितीचे  हर्षाली पाटील उपस्थित होते. वृत्तपत्र वाचनालयातर्फे सकाळ,लोकमत,देशदूत,दिव्य मराठी,तरुण भारत,रोजगार समाचार वृत्तपत्रे सकाळी ७.३० ते सायकांळी ७.३० वाजेपर्यंत वाचकांना उपलब्ध होतील. वाचकांनी मास्क घालून,स्वतः सॅनेटराईज वापर करून स्वयंशिस्तिने सोशल डिस्टन्सिंग पाळणे अपरिहार्य आहे.अन्यथा प्रवेश नाकारला जाईल असे आवाहन कार्यवाह महेश ठाकूर यांनी केले आहे. यावेळी सिद्धार्थ नेतकर म्हणाले  की ,  वृत्तपत्रे वाचनातून राष्ट्रीय कर्तव्ये व सामाजिक जबाबदारीचे भान येऊन चौकसपणा येतो.  समाजकार्य करीत पितृऋणातून ऊतराई होण्यासाठी राबविलेल्या अन्नदान,वृक्षारोपण,वृत्तपत्र वाचनालयांची उद्घाटने,कोविड काळात जनमत प्रतिष्ठान अंतर्गत मोफत शासकीय कार्यालयांचे सॅनेटरायझेशन,मास्क व सॅनेटराईझ वाटप हे सर्वस्तरीय कालोचित कार्यक्रम समर्पित भावनेने केल्या बद्दल त्यांनी अध्यक्ष पंकज नाले यांच्या बद्दल गौरवोद्गार काढले..सूत्रसंचालन महेश ठाकूर व आभार  हरीणाक्षी ब्युटी पार्लर संचालिका किर्ती ठाकूर यांनी केले .

 

Protected Content