सचिन तेंडुलकर कोरोना पॉझिटिव्ह

 

मुंबई : वृत्तसंस्था । भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाली आहे. सचिननेच माहिती ट्विटरवरुन दिली . आपण होम क्वारंटाइन असून डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सुचनांचे मी पालन करत आहे असं सचिनने म्हटलं आहे.

 

“कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी मी नेहमीच सर्व नियम पाळत काळजी घेत होतो . मी अनेकदा चाचण्याही केल्या होत्या. मात्र आज माझी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला मध्यम स्वरुपाची लक्षणं दिसत आहेत. मी स्वत:ला घरीच क्वारंटाइन केलं आहे. माझ्या डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सुचनांचे मी पालन करत आहे,” असं सचिनने ट्विटमध्ये म्हटलं आहे. “मला आणि देशातील अनेकांना पाठिंबा देणाऱ्या आरोग्यसेवेतील सर्वांचे मी आभार मानतो”, असं म्हणत  त्यांनी आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांचे आभार मानलेत.

 

सचिनने रस्ते सुरक्षा क्रिकेट मालिकेमध्ये भारत लिजंड्स संघाचं नेतृत्व केलं होतं. २१ मार्च रोजी रायपूर येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारत लिजंड्स संघाने श्रीलंका लिजंड्सचा १४ धावांनी पराभव करून जागतिक रस्ते सुरक्षा क्रिकेट मालिकेचे जेतेपद संपादन केलं होतं. अनेक क्रिकेटपटुंनी मास्क घालण्यासंदर्भात केलेल्या विशेष व्हिडीओमध्ये सचिनसोबत सौरभ गांगुली, राहुल द्रवीड यासारख्या खेळाडूंनी सहभाग घेत जनजागृती केली होती.  त्याच्या संपर्कात आलेल्या जळच्या व्यक्तींच्या चाचण्यासंदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

 

Protected Content