रंगश्री आर्ट फाऊंडेशनची विद्यार्थ्यींनी अमृता वाणी पोस्टर स्पर्धेत प्रथम

 

पाचोरा, प्रतिनिधी  ।  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, ताराबाई शिंदे स्री अभ्यासकेंद्र द्वारा राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेत रंगश्री आर्ट फाऊंडेशनची विद्यार्थ्यींनी अमृता वाणी हिने प्रथम क्रमांक पटकवला.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, ताराबाई शिंदे स्री अभ्यासकेंद्र द्वारा राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या पोस्टर स्पर्धेत कोरोना काळात ‘स्त्रियांवर  वाढलेले अत्याचार व हिंसाचार’ हा  विषय होता.  ह्या स्पर्धेसाठी अनेक विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या स्पर्धेत गव्हर्नमेंट स्कूल ऑफ आर्ट औरंगाबाद व पाचोऱ्यातील रंगश्री आर्ट फाऊंडेशन ची विद्यार्थीनी अमृता दिपक वाणी हिने प्रथम क्रमांकाचे ३ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाण पत्र मिळवून यशस्वी झाली आहे.  ह्या पोस्टर स्पर्धेत तिने काढलेल्या चित्रात एक स्री जी स्वयंरोजगार आहे ती कशा पध्दतीने घर संभाळून वर्क फ्राॅम होम करते आणि तरी तिचा छळ केला जातो. म्हणूनच तिचे तोंड बंद करण्यासाठी तिला त्रास देणारे पुरूषांचे हाथ तिला मास्क म्हणून लावले आहेत. आणि स्टे होम स्टे सेफ़? असे प्रश्नार्थक शीर्षक देण्यात आले आहे. यातुन “व्हाईलेंन्स  इज अॅज अन् अक्स्टेबल अॅज व्हायसर” हा संदेश अमृता वाणी हिने या चित्रा द्वारे दाखविण्याचा प्रयत्न केलेला  पाहावयास मिळाला आहे. अमृता वाणी हिचे परिसरातुन अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

Protected Content