भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला कवि संमेलन

जळगाव प्रतिनिधी | भीम रमाई प्रतिष्ठान, सत्यशोधकी साहित्य परिषद, डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम पुस्तक भिशी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांना आदरांजलीपर कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार, दि. ५ डिसेंबर रोजी जळगाव येथील अ‍ॅड.एस.ए.बाहेती महाविद्यालयात संध्याकाळी ५ वाजता कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.के.के.अहिरे राहणार असून प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ.अनिल लोहार, मुकूंद सपकाळे, प्रा.डॉ.सचिन पाटील, डॉ.मिलिंद बागूल, विजयकुमार मौर्य आदी. मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

कवी संमेलनात वसंत सपकाळे, प्रा.डॉ.सत्यजीत साळवे, प्रा.डॉ.प्रदीप सुरवाडकर, राहुल निकम, मोरेश्वर सोनार, मंगल बी.पाटील, भास्करराव चव्हाण, प्रफुल्ल पाटील, दिलीप सपकाळे, अरुणकुमार जोशी, आर.डी.कोळी, शिवराम शिरसाट, पुरुषोत्तम पारधे, पुष्पा साळवे, मिना सैंदाणे, पुष्पलता कोळी, इंदिरा जाधव, एस.पी.झाल्टे, किशोर नेवे, सुखदेव वाघ, शेख मोईम नईम, मुश्ताक करीमी, प्रकाश पाटील, अरुण वांद्रे, प्रमोद इंगळे, गोविंद देवरे, गोविंद पाटील, महेंद्र पाटील, मयुरेश निंबाळकर, गोपाल बागुल, सागर नाईक, रत्नाकर कोळी, प्रविण लोहार, अशोक पारधे, आर.जी.तडवी आदी. मान्यवर कवी सहभागी होणार आहेत.

रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी असे आवाहन डी.एम.अडकमोल, विजय लुल्हे, शिरीष चौधरी, बापू पानपाटील, अनिल सुरडकर, सुनील सोनवणे, विनोद निकम, साहेबराव बागुल, संजय ठाकुर आणि हेमंत बिर्‍हाडे यांनी केले आहे.

Protected Content