भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी  | भारतीय संविधान गौरव दिन व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने जळगाव येथील अल्पबचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

संविधान जागर समिती आणि महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा यांच्या वतीने भारतीय संविधान गौरव दिन व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने दिनांक सोमवार, दि.६ डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता अल्पबचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अब्दुल करीम सालार हे राहणार असून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष उत्तम कांबळे “आम्ही भारताचे लोक” या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत. याप्रसंगी ज्येष्ठ विधीज्ञ राजेश झाल्टे, डॉ. मिलिंद बागूल, वासंती दिघे, प्रा.डॉ.सचिन पाटील, ईश्वर मोरे, किशोर सूर्यवंशी आदी. मान्यवर उपस्थित राहणार असून कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे, डी.एम.अडकमोल, अमोल कोल्हे, विजयकुमार मौर्य, दिलीप सपकाळे, रमेश सोनवणे, चंदन बिऱ्हाडे, हरिश्चंद्र सोनवणे, भारत ससाणे, भारती म्हस्के, निलू इंगळे, रंजना तायडे यांनी केले आहे.

Protected Content