लॉक डाउन : शेंदूर्णी येथे विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्यांवर कारवाई केव्हा ?

शेंदूर्णी, प्रतिनिधी | देशात व राज्यात संचारबंदी आणि जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. त्याच बरोबर संपूर्ण राज्यात लॉक डाउन घोषित करण्यात आला आहे. मात्र,  या कालावधीत शेंदूर्णीत काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.

किराणा, दूध, भाजीपाला, वैद्यकीय सेवा व मेडिकल, बँक आणि शेतकऱ्यांना आवश्यक असलेली कृषी केंद्र यांना लॉक डाउन मधून वगळण्यात आले आहे. शेतीशी संबंधित मजूर व शेतकऱ्यांना आपल्या शेतातील गहू, मका, बाजरी, हरभरा, ज्वारी या पिकांच्या काढणीसाठी शेतावर जावे लागत आहे. तर पीक काढणी चालू असल्याने थ्रेशर मालक व मजुरांना जावेच लागते . तसेच गुरांना वैरण घालण्यासाठी आणि दुभत्या जनावरांचे दूध काढण्यासाठी सकाळी व संध्याकाळी दोन्ही वेळी शेतकऱ्यांना शेतावर, खळ्यावर जावे लागते. दूध आणून डेअरीला दूध घालावे लागते. तर काही नागरिकांना रेशन, किराणा, भाजीपाला, औषधी घेण्यासाठी व बँक व्यवहारासाठी ना इलाजने घराबाहेर पडावे लागत आहे. अशा स्थितीत ९०% जनता संचारबंदीचे नियम पाळून आपल्या घरातच बसलेली आहे . परंतु ,ग्रामीण भागातील १०% जनतेला नाईलाजाने घराबाहेर पडणे गरजेचे होत आहे. त्यांच्या वेळा ही ठरलेल्या त्यामुळे परिस्थिती न समजून घेता काही समाजसेवक अश्या परिस्थितीत वेळेवेळी पोलीस व प्रशासकीय कर्मचारी यांना नको ते सल्ले देऊन संचारबंदीचे उल्लंघन होत असल्याचे तक्रारी करीत असल्याचे आढळुन येत आहेत. शेतकऱ्यांना जर दैनंदिन कामे करण्यासाठी शासनाने बंदी घातलेली नाही तर पोलीस प्रशासन त्याना वेठीस धरण्यात काय अर्थ आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही नागरिक कारण नसतांनाही गावभर दुचाकी घेऊन हिंडताना दिसत आहेत. त्यांना नियम नाही का ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. जरका लॉक डाउन व संचारबंदी, जमावबंदी आदेशाचे पालन करायचे आहे तर आपणच घराबाहेर न पडणे हा सर्वोत्तम उपाय असल्याचे सरकारतर्फे वेळीवेळी सांगितले जात असतांना काही महाभाग घरा बाहेर कोण पडतंय हे पाहण्यासाठी स्वतः घराबाहेर फिरून प्रशासनाला अडचणीत आणण्याचे काम करीत असल्याचे नागरिक व प्रशासकीय कर्मचारी सांगत आहेत. तरी आनावश्यकपणे घराबाहेर फिरणाऱ्या दुचाकी स्वारांवर कारवाई होणे अपेक्षित असल्याचे नागरिकांनी बोलून दाखविले आहे..

Protected Content