लसीकरण वाढविण्यासाठी प्रोत्साहन द्या : खासदार रक्षाताई खडसे

जळगाव, प्रतिनिधी ।  रावेर लोकसभा मतदार संघातील रुग्णालयात कोविड-१९ लसीकरण व लसीच्या पुरवठ्याबाबत अनेक तक्रारी आल्याने आज खासदार रक्षाताई खडसे यांनी  वैद्यकिय आरोग्य अधिका-यांची आढावा बैठक घेतली. या  आढावा बैठकीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. रंजनाताई पाटील ह्या उपस्थितीत होत्या.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनाच्या  सभागृहामध्ये आयोजित बैठकीत रावेर लोकसभा मतदार संघातील रुग्णालयांत तसेच लसीकरण केंद्रात वेळेवर लस उपलब्ध होत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. तसेच बऱ्याच नागरिकांना व रुग्णाना वेळेवर लसचा दुसरा डोस मिळत नाही, व बरेच लोक लसीकरणापासून वंचीत राहत आहे. या संदर्भात वैद्यकिय अधिका-याची आढावा बैठक घेवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कर्मचारी अपूर्ण आहे. लसीकरणासाठी नागरिक मोठ्या प्रमाणांत गोंधळ घालत असल्याने लसीकरण ठिकाणी पोलिस बंदोबस्त अथवा सरंक्षण मिळावे अशी वैद्यकिय अधिकारी यांनी विनंती केली. बैठकीत ग्रामीण भागातील लसीकरणासाठी ग्रामपंचायतीचे ऑपरेटर यांची मदत घ्यावी, १०० टक्के लसीकरण झालेल्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन म्हणून त्यांचा सत्कार करावा. लसीकरण ठिकाणी बॅनर लावून जनजागृती करावी अशा सूचना खासदार रक्षाताई खडसे व जिल्हा परिषद अध्यक्षा ना. रंजनाताई पाटील यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्यात.

Protected Content