जनावरांमध्ये लम्पी आजाराचा धोका वाढतोय : जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश ! (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सध्या जळगाव जिल्ह्यातील जनावरांवर होणाऱ्या लम्पी स्कीन आजारामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या अनुषंगाने लम्पी स्कीन या रोगाचे प्रतिबंध, नियंत्रण आणि निर्मूलन करण्याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सोमवारी १२ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत म्हणाले की, जिल्ह्यात जनावरांच्या लम्पी स्कीन आजाराचे नियंत्रण व प्रतिबंधक आणि त्याचे निर्मूलन करण्यासाठी काही अटी शर्ती लागू करण्यात आले आहे. यात बाधित क्षेत्राच्या बाहेर गुरांना ने-आण करण्यास मनाई करण्यात आले असून त्यांच्या संपर्कात असलेल्या कोणत्याही प्रकारची वैरण, जनावरांच्या निवारासाठी असलेले गवत व अन्य साहित्य अशा प्राण्यांचे शेव कातडी किंवा असे प्राणी नियंत्रण क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी मनाई आहे. शिवाय गोजातीय प्रजातीच्या गोरे व म्हशींचा कोणताही बाजार बाजार भरविणे, शर्यत लावणे, जत्रा भरवणे किंवा प्रदर्शन करण्यासाठी मनाई करण्यात आलेली आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या ३३ बाधित क्षेत्र असून एकूण पशुधन संख्या १ लाख २५ हजार ९८८ आहे त्यापैकी १ लाख ११ हजार ८०२ जनावरांची लसीकरण पूर्ण झाले आहे. सध्या जिल्ह्यात २ लाख २ हजार लसीचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी घेण्यासाठी सार्वजनिक चराईकुरण चारण्यास मनाई असून जनावरांची वाहतूक करणे पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. हे आदेश सर्वांसाठी बंधनकारक आहे. दरम्यान नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी देखील माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

 

Protected Content