डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात बाळशास्त्री जांभेकर जयंती उत्साहात

जळगाव प्रतिनिधी । शहरातील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती साजरी करण्यात आली.

गत दोन वर्षापासून समाजावर कोरोनाचे संकट कायम आहे. या कोरोना काळात अत्यंत गंभीर परिस्थीतीतही समाजापर्यंत सकारात्मक माहिती पोहोचविण्याचे काम पत्रकारांनी केले आहेत. कोरोनाकाळापासून पत्रकार हे फ्रंट वॉरियर म्हणून लढत असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी केले असून ते आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

पुढे बोलतांना डॉ.उल्हास पाटील म्हणाले की, अंत्यंत कठीण काळात दर्पणकार बाळशास्त्रींनी मराठी वृत्‍तपत्र सुरु केले. समाजातील सर्वसामान्य नागरिकांचा आवाज म्हणून त्यांनी दैनिकाच्या माध्यमातून अनेक बाबींवर प्रकाश टाकला. प्रामाणिकपणा, निष्पक्षपणा आणि निर्भिडता हि शिकवण आताच्या पत्रकारांना आचार्य जांभेकर यांनी घालून दिली. कोरोना काळात पत्रकारांनी समाजात असलेली भिती कमी करण्याचे उल्‍लेखनीय कार्य केले. अशाच पद्धतीने समाज जागृतीचे कार्य यापुढेही घडत राहो, अशी अपेक्षाही डॉ.उल्हास पाटील यांनी व्यक्‍त केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे लेखिका माधुरी चौधरी व डॉ.उल्हास पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

यावेळी लेखिका माधुरी चौधरी, महेंद्र चौधरी, डॉ.मिलींद चौधरी, डॉ.अखिल चौधरी यांच्यासह आदी सोशल मिडीयाप्रमुख गणेश महाजन, मिडीया विभागाच्या गौरी जोशी, आर्टिस्ट दिनेश पाटील, सुरेश अहिरराव, तुषार कानडे, कल्याणी कुलकर्णी, व्हिडीओ एडिटर नितीन नेवे आदि उपस्थितीत होते.

 

Protected Content