अपघातात मयत झालेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबियाला आर्थिक मदत

यावल प्रतिनिधी । येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबियांना विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने ५ लाख १० हजाराचा धनादेश देवून आर्थिक मदत देण्यात आली.

 

सविस्तर माहिती अशी की, यावल येथील महाविद्यालयात सन २०२० मध्ये बी.ए.च्या शेवटच्या वर्षाला शिकत असलेला विद्यार्थी फिरोज कादर खाटीक याचा २७ जुलै २०२ रोजी अपघाती मृत्यू झाला होता. या अनुषंगाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने ५ लाख १० हजाराची मदत जाहीर करण्यात आली. शुक्रवारी २१ जानेवारी रोजी फिरोजचे वडील यांना धनादेश देण्यात आला.  परिवाराला आर्थिक मदतीचा हात देण्यात आला आहे. त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांनी त्यांना धनादेश प्रदान केला आहे. याप्रसंगी उपप्राचार्य एम.डी. खैरनार, प्रा.ए.पी. पाटील, मिलिंद बोरघडे, डॉ.एस.पी. कापडे, डॉ. पी. व्ही. पावरा, प्रा. एस. आर. गायकवाड, संतोष ठाकूर व शिक्षकेतर आदी कर्मचारी उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!