ट्रकमध्ये बसून जुगार खेळणाऱ्या आठ जणांवर कारवाई

WhatsApp Image 2019 09 25 at 6.02.20 PM

जळगाव, प्रतिनिधी । एमआयडीसीमध्ये एका ट्रकमध्ये बसून जुगार खेळणाऱ्या  तरुणांवर एमआयडीसी पोलिसांनी छापा मारून कारवाई करत ट्रकसह ८ लाख ९९ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

एमआयडीसी पोलिस ठाण्यापासून अंदाजे ६०० मिटर अंतरावर के.के.कॅन्स कंपनीच्या समोर एका ट्रकमध्ये बसून आठ तरुण जुगार खेळत होते. यात  सिकंदर हकीम पटेल (वय ३०, रा. पोलीस कॉलनी), लखन रामदास पवार (वय ३०, रा. कुसुंबा), सलमान गुलामनबी चौधरी वय २९, रा. संतोषी माता चौक, मेहरुण), शरद श्रावण सोनवणे (वय ३९, रा. रामेश्वर कॉलनी), हेमंत मुकुंदराव पाटील (वय ४१, रा.ज्ञानदेवनगर, गीताईनगर), शहाबुद्यीन शेख सलीमोद्यीन (वय ३७, रा.पोलीस कॉलनी), मोहम्मद हनीफ गुलाम मुर्तुजा (वय ७३, रा.सदाशीव कॉलनी, दत्तनगर), गोपाळ गोविंदा सोनवणे (वय ३३, रा. रामेश्वर कॉलनी) यांचा समवेश आहे.  हे सर्व जुगारी के.के.कॅन्स कंपनीच्या बाहेर उभ्या असलेल्या ट्रकमध्ये (एमएच ०१ एल २४०३) जुगार खेळत होते. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर उपनिरीक्षक राजकुमार ससाणे, विशाल सोनवणे, अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, किशाेर पाटील, हेमंत कळसकर, सचिन पाटील यांच्या पथकाने छापा मारला. जुगार खेळणाऱ्यांकडून पत्ता-जुगाराची साधने, रोख रक्कम, मोबईल तसेच ट्रक असा एकुण ८ लाख ९९ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Protected Content