मनपातर्फे पोर्चमध्ये बांधकाम केलेले दुकान सील (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 09 25 at 3.47.25 PM

जळगाव, प्रतिनिधी | चार दिवसांपूर्वी उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुटे यांनी फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील ८ अनधिकृत गाळ्यांवर कारवाई केली होती. यात फुले मार्केटमधील दाणाबाजाराच्या बाजूने कबुतरखाना गल्लीत वरच्या मजल्यावर झवर ब्रदर्स औषधीचे दुकानात पोर्चमध्ये बांधकाम करून औषधीचे दुकान थाटल्याचे अढळून आले होते. त्यास आज सील करण्यात आले.

शनिवार २१ सप्टेंबर रोजी झवर ब्रदर्स दुकानात दिलेल्या जागे वेतरीक्त पोर्चमध्ये बांधकाम करून औषधीचे दुकान थाटल्याचे उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुटे यांना अढळून आले होते. तसेच वर पून्हा शेड उभारून तेथे सामान ठेवल्याचे अढळून आले होते. आज बुधवार २५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास महापालिकेचे पथक दुकानात दाखल झाले होते. यावेळी अतिरिक्त बांधकाम केलेल्या जागेस दरवाजा नसल्याने तेथे दरवाजा बसवून सील करण्याचे आदेश उपायुक्तांनी दिले होते. त्यानुसार आज मनापा पथकाने अतिरिक्त बांधकामास सील केले. या पथकांत किरकोळ वसुली विभाग, बांधकाम विभाग, अतिक्रमण विभागच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

Protected Content