शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात “वनस्पतीजन्य पूर्ण आहार” विषयावर मार्गदर्शन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे जनऔषधवैद्यक शास्त्र विभाग व फिजिशियन्स असोसिएशन्स ऑफ इंडियातर्फे शास्त्रीय प्रयोगाद्वारे सिद्ध झालेले पोषण आहार म्हणजेच “वनस्पतीजन्य पूर्ण आहार” या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात फिजिशियन्स असोसिएशन्स ऑफ इंडिया संस्थेचे अध्यक्ष डॉ. रजीना शाहीन यांनी विशेष व्याख्यानाद्वारे माहिती देऊन वनस्पतीजन्य आहाराचे महत्व पटवून सांगितले. कार्यक्रमाचा सुमारे २०० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, उप अधिष्ठाता डॉ. गजानन सुरेवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, जनऔषधवैद्यक शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. योगिता बावसकर मंचावर उपस्थित होते. त्यानंतर प्रस्तावनेत डॉ. योगिता बावसकर यांनी, कार्यक्रमाविषयी माहिती देऊन आहार पद्धती विषयी सविस्तर माहिती देऊन त्याचे महत्व पटवून दिले.

 

यानंतर  फिजिशियन्स असोसिएशन्स ऑफ इंडिया संस्थेचे अध्यक्ष डॉ. रजीना शाहीन यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. दिवसेंदिवस आधुनिक जीवनशैलीमुळे उच्चरक्तदाब, मधुमेह,हृदयविकार अशा दुर्धरआजारांचे प्रमाण वाढत आहे. अलोपथिक उपचारांनी त्यावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवणे शक्य होते. पण या आजारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आपण आहारात वनस्पतीजन्य अन्नपदार्थांचा प्रामुख्याने वापर केला पाहिजे. तरच  विनाऔषध आपण या आजारांवर पूर्णपणे नियत्रंण करून दूर ठेवता येणे शक्यआहे. हे अनेक शास्त्रीय प्रयोगाद्वारे सिद्ध झाले आहे, अशीही माहिती डॉ. शाहीन यांनी दिली.

 

कार्यक्रमाला अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांचे मार्गदर्शन तर डॉ. अरुण कसोटे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला २०० विद्यार्थी सहभागी होते. सूत्रसंचालन ट्विंकल काकवानी व ऋजुता बोरा यांनी केले. तर आभार प्रतिज्ञा मोरे हिने मानले. कार्यक्रमासाठी विविध विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते. डॉ. विलास मालकर, डॉ. जितेंद्र सुरवाडे, डॉ. गणेश लोखंडे, डॉ. डॅनियल साजी, डॉ. सुनयना कुमठेकर यांनी विशेष तर  २० विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून परिश्रम घेतले.

Protected Content