जि. प. अध्यक्ष्यांंच्या भेटीत आढळला म्हसावद आरोग्य केंद्रात सावळा गोंधळ

WhatsApp Image 2019 07 18 at 9.29.06 PM

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा परिषद अध्यक्ष्या उज्वला पाटील यांनी आज गुरुवार १८ जुलै रोजी अचानक म्हसावद , गलापूर्, आदिवासीवस्ती आदी भागात भेट दिली. या भेटी दरम्यान, म्हसावद आरोग्य केंद्राचा गजब कारभार समोर आला. एरंडोल तालुक्यातील गालापुर येथील प्राथमिक शाळेस भेट दिली असता पटसंख्या व प्रत्यक्ष उपस्थितीत यात तफावत आढळून आली. याबाबत नाराजी व्यक्त करून अध्यक्षांनी शिक्षकांना पालक भेटी घेवून उपस्थिती वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या.

पद्मालय डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आदिवासी वस्ती डाभरी येथील शाळेत २ शिक्षक ,१ ते ४ वर्ग , पटसंख्या सर्व ४ वर्ग मिळून २६ विद्यार्थी आहेत. परंतु, प्रत्यक्ष ६ विद्यार्थी उपस्थित होते. आदिवासीवस्ती असल्यामुळे पालक शिक्षणांंसाठी गंभीर नसल्याने स्वतः अध्यक्ष यांनी महीलांशी चर्चा करून शिक्षणाचं महत्त्व पटवून दिले. तेथील अडीअडचणी आदिवासी महिलांनी अध्यक्षकडे मांडल्या. अध्यक्षा उज्वला पाटील यांनी वस्तीवर येणार रस्ता हायमास लाईट बसवून देईन पण तुम्ही देखील मुलांना शाळेत पाठवायचा शब्द मला द्या असे सांगितले. त्यावर महिलांनी होकार दिला.

म्हासावद आरोग्य केंद्रात सावळा गोंधळ : सफाई कामगाराची १९ तारखेची हजेरी
अध्यक्षा उज्वला पाटील यांनी म्हासावद आरोग्य केंद्रास भेट दिली असता डॉ. संजीव चव्हाण यांचे कर्मचाऱ्यांवर कुठलेच नियंत्रण नसल्याचे दिसून आले. हजेरी रजिस्टर तपासले असता सफाई कामगार ए. पी. जावळे १ दिवस आगाऊ म्हणजे १९ तारखेची देखील हजर असल्याची सही करून निघून गेला होता. तर कनिष्ठ सहाय्यक एम. एस. तडवी हे ३ दिवसांंपासून रजा व गैरहजेरी न दाखवता ३ दिवसापासून कार्यालयात आलेलेच नाही. .lhv श्रीमती वाय. बी. तायडे ह्याही रजा न टाकता गैरहजर होत्या. वाहन चालक यांना गाडीचे लॉक बुक मागितले असता ते मिळून आले नाही. अध्यक्षांनी गाडीचे किलो मीटर रीडिंग घेतले ७०८५७ होते. प्रत्यक्ष रीडिंग व लॉक बुक यात तफावत असल्यामुळेच ते अध्यक्षांना वाहन चालक याने दाखविण्यास टाळाटाळ केली असावी अशी शंका व्यक्त होत आहे. या सर्वांबाबत वैद्यकिय अधिकारी यांनी लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश अध्यक्षांनी दिलेत. प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे ते देखील आठ दिवसात साफ सफाई करून घ्यावी याबाबतीत अध्यक्षांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देखील चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या व दोषींवर कारवाई करण्याच आदेश दिलेत.

Protected Content