फैजपूर येथे दोन गटात हाणामारी : दंगलीचा गुन्हा दाखल

clashes 204851

फैजपूर, प्रतिनिधी | येथील हॉटेल स्वप्नरूपजवळ किरकोळ कारणावरून सेवानिवृत्त पोलीस शेख शकील शेख दगु व माजी नगरसेवक यांच्यात किरकोळ कारणावरून हाणामारी झाल्याची घटना दुपारी १.३० वाजता घडली होती. दोघांनी परस्परविरोधात तक्रारीवरून दोन्ही गटातील १२ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक माहिती अशी की, सावदा रस्त्यावर असलेल्या हॉटेल स्वप्नरूपसमोर सेवा निवृत्त पोलीस शेख शकील तसेच माजी नगरसेवक शेख जफर या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून दुपारी १.३०च्या सुमारास हाणामारी झाली. त्यात शेख शकील याने आपल्या फिर्यादीत आपल्या अंगावर पेट्रोल टाकून तसेच किटकनाशके तोंडावर मारून आठ जणांनी मारहाण करीत आपल्या खिशातील २० हजार रुपये काढून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शेख जफर याने आपल्या फिर्यादीत शेख शकील व त्याच्या सोबतच्या चार लोकांनी मागील कारणावरून मारहाण करीत चाकूने गळ्यावर वार करण्याच्या प्रयत्न केला, मात्र तो चुकविल्याने चाकु दंडावर लागला आहे. तसेच गळ्यातील ६० रुपये किमंतीची सोन्याची चेन व चार हजार रुपये हिसकावून नेले असल्याचे म्हटले आहे.

याप्रकरणी दोन्ही गटातील १२ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख शकील याने दिलेल्या तक्रारीवरून माजी नगरसेवक शेख जफर यांनी मोटार सायकल अडवून माजी बदनामी केली या कारणावरून शेख जफर, शेख अक्तर शेख अजगर, मोसम गफ्फार शेख, शोएब गफ्फार शेख, शेख जफर यांचा मुलगा तसेच दानिश अक्तर शेख, मतीन अक्तर शेख, कलीम जफर यांचा शालक या सर्वांविरूध्द तर शेख जफर यांच्या फिर्यादीनुसार शेख शकील शेख दगु, साहिल शेख शकील, अष्पाक शेख शकील, तौसीफ तसेच शकील यांची पत्नी अशा १२ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनी प्रकाश वानखेडे, फौजदार जिजाबराव पाटील, हेमंत सांगळे व सहकारी करीत आहेत.

Protected Content