धरणगाव तालुक्यातील अवैध गौणखनीज वाहतुकदारांवर कारवाई

tractor karwai

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील बांभोरी शिवारातील गिरणी नदीत पात्रात अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या 11 ट्रक्टरांवर कारवाई करण्यात आली. यातील दोन ट्रक्टर घेवून फरार झाले आहे. या कारवाईमुळे वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, गिरणा नदीच्या पात्रात अवैधरित्या विनापरवाना वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती धरणगाव प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार एरंडोल उपविभागीय अधिकारी, धरणगाव तहसिलदार आणि नायब तहसीलदार, तलाठी यांच्यासह इतरांनी 11 वाहनांवर कारवाई करण्यात आली. 11 वाहनांपैकी 2 वाहने पळवून नेले.

वाहनाचा चेसीस क्रमांक MBNAV५३ACKCA२१६४२ चे ट्रॅक्टर, एमएच-१९ पी ६५६९, एमएच १९ बीजी ५८९९, एमएच-१९ सी.जे.-०९३७ ५, एमएच-१९ बी.जी. ८७६२, एमएच-१९ बी.जी.-४३६९, एमएच-१९ बी.जी.-९०७६, एमएच-१९ बी.जी.-२७५५, एमएच-१९ एएन-१९६२, एमएच-१९ पी ०३९२ यांच्यावर कारवाई करण्यात आली असून 9 वाहने जप्त करण्यात आली आहे.

सदर ११ वाहनांपेकी २ वाहने (ट्रॅक्टर) नं. एमएच-१९ एएन-१९६२, एमएच-१९ पी ०३९२ ही वाहने पळवून नेले असून यावर धरणगाव पोलीसात संबंधित वाहन चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेली वाहनांवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ४८ (७) व (८) मधील सुधारणांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

Protected Content