Home क्राईम उभ्या ट्रकवर दुचाकी आदळल्याने एक जण ठार

उभ्या ट्रकवर दुचाकी आदळल्याने एक जण ठार

0
48

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । सावदा ते वाघोदा गावाच्या दरम्यान महामार्गावर उभ्या असणार्‍या ट्रकवर दुचाकी आदळल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाला आहे.

याबाबत वृत्त असे की, बर्‍हाणपूर-अंकलेश्‍वर महामार्गावर सावदा ते वाघोदा दरम्यान द्राक्ष मळा जवळ दिनांक ३१ मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान डिस्कवर मोटर सायकल ने गोविंदा आनंदा चौधरी (चहार्डीकर वय ५५) हे सावदा येथील श्री मेडीकल वरून वाघोदा बुद्रुक येथे आपल्या घरी जात असताना अपघात होऊन ते जागीच ठार झाले. या घटनेचा गुन्हा सावदा पो.स्टे. नोंदविण्यात आला आहे. रसत्यावर फेल पडलेल्या उभ्या असणार्‍या ट्रक वर मोटारसायकल आदळल्याने हा अपघात झाला. या प्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक श्री पवार करीत आहेत.


Protected Content

Play sound