यावलच्या मॉडर्न स्कूलतर्फे गरजूंना मदतीचा हात

यावल प्रतिनिधी । येथील मॉडर्न इंग्लीश मीडियम स्कूलतर्फे गरजूंना मदतीचा हात देण्यात आला असून त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या राज्यात या महामारीच्या आजाराचे प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन असल्याने हातावर पोट भरणार्‍या गोरगरीबांच्या कुटुंबावर उपासमारीचे प्रसंग येवुन ठेपले आहे. अशा वेळी गोरगरीबांच्या मदतीला अनेक दानशुरांचे हात सरसावले आहेत. यात यावल येथील मॉडर्न इंग्लिश मेडीयम स्कूल, च्या वतीने या आपातकालीन परिस्थितीत संकटासमयी गरीब विधवा, परित्यक्ता स्रियांना, जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. यात गहू, तांदूळ, साखर, डाळ, अंघोळीचा व कपडे धुण्याचा साबण आणि बिस्कीट पुडा यांचा समावेश होता. हे किट चितोडा, अट्रावल, सांगवी, या गावांना जवळ पास दोनशे कुटुंबांना शाळेच्या अध्यक्षा कु.नीता गजरे व सचिव धिरज पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी चितोडा सरपंच तडवी मॅडम, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख कडू पाटील, अट्रावल सरपंच सौ संगीता नितिन चौधरी, उपसरपंच, नितिन व्यंकट चौधरी यांच्यासह अन्य मान्यवर, तसेच सांगवी येथील सरपंच तनुजा योगेश भंगाळे, उपसरपंच, सोनू धनगर,तसेच सर्व ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य, साक्षी अग्रवाल , शारदा पांडव, निलेश चौधरी, सचिन बारी यांनी अनमोल सहकार्य केले. या शैक्षणीक संस्थेच्या वतीने मिळालेल्या मदतीचे गोरगरीब गरजुंनी आभार मानले.

Protected Content