जागतिक महिला दिनानिमित्त अंगणवाडीस साहित्याचे वाटप

*चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या ग्रामनिधीतून दहा टक्के निधी खर्च करून अंगणवाडीस विविध साहित्याचा वाटप केले आहे.

देशात दरवर्षी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन म्हणून उत्साहात साजरा करून स्त्रीयांचा सन्मान करण्यात येते. दरम्यान तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायतीने या दिवसाला अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. ग्रामपंचायतच्या ग्रामनिधीतून महिला बालकल्याणचे १० टक्के निधी खर्च करून अंगणवाडीस इन्फंट ओ मीटर,
स्टेडी ओ मीटर, मातांचे वजन काटे, साल्टर वजन काटा असे (एकूण ८९००) रूपयांचे साहित्य वाटप करण्यात आले आहे. यामुळे अशाप्रकारे अंगणवाडीस साहित्य वाटप करणाऱ्या चैतन्य तांडा ग्रामपंचायती हे तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांच्या उपस्थितीत हे साहित्य वाटप करण्यात आले आहे. यावेळी लोकनियुक्त सरपंच अनिता दिनकर राठोड यांनी महिलांविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी ग्रामसेवक कैलास जाधव, सरपंच अनिता राठोड, उपसरपंच आनंदा राठोड, भीमराव चव्हाण, रोहिदास जाधव, उदल पवार, मानसिंग राठोड, ताईबाई राठोड, विमल भाई, अंगणवाडी सेविका शोभा चव्हाण, मदतनीस पवार, करगाव विकास सोसायटीचे माजी चेअरमन दिनकर राठोड आदी उपस्थित होते.

Protected Content