जैन साधूंच्या हत्येच्या निषेधार्थ दहीगावात मूकमोर्चा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कर्नाटकमध्ये जैन समाजाचे आचार्य कामकुमार नंदी यांचे अपहरण करून निर्घृण खून करण्यात आल्याच्या निषेर्धात आज सकल दिगंबर जैन समाजातर्फे दहिगावात बंद पुकारण्यात आला. तर जैन समाज बांधवांनी काळ्या फिती लावून मुकमोर्चा काढण्यात आला. याप्रकरणी यावल येथे तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी दहिगावचे प्रथम नागरीक सरपंच अजय अडकमोल, यावल पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील, दहिगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच देवीदास धांगो पाटील , सकल दिगंबर जैन समाजातर्फ मोठया संख्ये समाज बांधव व महिला भगिनी उपस्थित होत्या , दरम्यान ५ जुलै रोजी चिक्कोडी गाव जिल्हा बेलगाम गावाजवळील हिरेकोडी येथील काही अज्ञात लोकांकडुन जैन साधुआचार्य कामकुमारनंदी त्यांचे अपहरण करण्यात आले होते , त्यांना अज्ञात स्थळी त्यांची निघृणपणे हत्या करून त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आल्याची घटना घडली असुन, या घटनेचे गांर्थीय लक्षात घेत प्रशासनाने तात्काळ तपास यंत्रणाची चक्रे फिरवुव या हत्याप्रकरणी सहभागी असलेल्या संशयीत हुसैन दलाइट आणी नारायण माली या दोन गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.

या घटनेच्या पार्श्वभुमीवर निषेध म्हणुन आज सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने दहिगाव गाव हे पुर्णपणे बंद ठेवण्यात आले यावेळी गावातुन जैन समाज बांधवांच्या वतीने काळया फिती लावुन मुकमोर्चा काढण्यात आला व नंतर यावल तहसीलवर मोर्चा काढुन तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांना शासनाने देशभरातील जैन साधुसंत यांच्या सुरक्षेविषयी कठोर कायदा करावा तसेच कर्नाटकाच्या निंदनिय घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .

Protected Content