दिव्यांग सेना व विकास महासंघातर्फे तहसीलदार नितीन देवरे यांचा सत्कार

धरणगाव प्रतिनिधी । दिव्यांग सेना व दिव्यांग विकास महासंघाच्या वतीने धरणगाव तालुका कर्तव्यदक्ष तहसीलदार नितीन देवरे यांचा दिव्यांग विकास महासंघाचे अध्यक्ष पी.एम.पाटील, दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन, तालुकाध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

त्यावेळेस तहसीलदार यांनी मोलाचे मार्गदर्शन करून सर्व गोरगरीब तालुक्यातील दिव्यांग बांधवांना अंत्योदय योजना मध्ये 35 किलो धान्य योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामध्ये दिव्यांग बांधवांना बीपीएल पिवळे कार्ड देण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.

त्यावेळेस वासुदेव वाघ धरणगाव शहराध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्ष प्रतिभा पाटील, महिला उपजिल्हाध्यक्ष सरला सोनवणे, देवा महाजन, सुदाम चव्हाण, सपना चौधरी,शहर प्रमुख नंदलाल कुलथे, राजू चौधरी उपशहर प्रमुख, राजेंद्र फुलपगारे, ज्योती पाटील तसेच पदाधिकारी उपस्थित होते. अंत्योदय योजनेचा लाभ मिळणार असल्यामुळे दिव्यांग बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. लवकरात लवकर या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Protected Content