कोरोना रूग्णांना दिलासा : नागपूरात मध्य भारतातील पहिले कोविड रुग्णालय

नागपूर वृत्तसंस्था । राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागपुरात कोरोना रुग्णांचा आकडा १५२ वर पोहोचला आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नागपुरात मध्य भारतात पहिलं सुसज्ज कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. जवळपास २०० खाटांचे हे कोविड रुग्णालय आहे. मध्य भारतातल्या पहिलं कोविड हॉस्पिटलचा कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नागपूरच्या मेडिकलमधील ट्रॉमा सेंटरमध्ये हे कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. जवळपास २०० खाटांच्या या कोवीड रुग्णालयात ६० खाटा या आयसीयूसाठी ठेवण्यात आल्या आहेत. एवढेच नव्हे स्वतंत्र क्ष-किरण विभाग, प्रयोगशाळा, रक्तसाठा केंद्र अशा सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असलेलं हे मध्य भारतातील हे पहिलं कोविड रुग्णालय आहे.

या रुग्णालयात सध्या ५४ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. तर याच रुग्णालयातून २६ कोरोना रुग्ण बरे झाले आहे. यामुळे मध्य भारतातील हे पहिलं रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी मोठा आधार बनत आहे. दरम्यान नागपुरात कालचे सर्व १९३ रिपोर्ट निगेटिव्ह आलेत. नागपूर शहरात आतापर्यंत १५१ कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. काल चार रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याने कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५० वर पोहोचली आहे. ‘कोरोना’वर मात करणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 33 टक्के झालं आहे.

Protected Content