कंपनी एकत्रीकरण दस्तांच्या मुद्रांक शुल्कावरील कमाल मर्यादेत वाढ

thorat and thakre

मुंबई प्रतिनिधी । राज्य मंत्रीमंडळाने आज कंपनी एकत्रीकरण दस्ताच्या मुद्रांक शुल्कावरील कमाल मर्यादेत वाढ करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.

राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यात महसूल खात्याशी संबंधीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला. कंपनी एकत्रीकरण किंवा पुनर्रचनेसंबंधीच्या दस्तांसाठी आकारण्यात येणार्‍या मुद्रांक शुल्कावर विहीत केलेली कमाल मर्यादा २५ कोटीवरुन ५० कोटीपर्यंत वाढविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. कंपनी एकत्रिकरण किंवा पुनर्रचनेसंबंधीच्या दस्तांवर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या अनुसूची-१ च्या अनुच्छेद २५(वर) खाली देय असलेल्या मुद्रांक शुल्कावर दि.०६ मे, २००२ रोजीच्या आदेशांन्वये विहित केलेली कमाल मर्यादा २५ कोटी वरुन ५० कोटी रुपये पर्यंत वाढविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

Protected Content