धरणगाव तालुक्यातील ‘त्या’ कोरोनाबाधित महिलेचा पत्ता सापडला !

धरणगाव प्रतिनिधी । शहरातील तीन जणांना कोराना असल्याचा अहवाल आज प्रशासनाला प्राप्त झाला होता. परंतू यातील एका 65 वर्षीय कोरोना बाधित महिलेचा पत्ता सापडत नसल्यामुळे यंत्रणेची तारांबळ उडाली होती. परंतू थोड्यावेळापूर्वीच ती महिला तालुक्यातील चोरगाव येथील असल्याची माहिती नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दिली आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव आता ग्रामीण भागातही पोहचल्यामुळे खळबळ उडाली आहे.

आज दुपारी साधारण दीड वाजेच्या सुमारास शहरातील तीन जणांना कोराना असल्याचा अहवाल नुकताच तालुका प्रशासनाला प्राप्त झाला होता. यानुसार कोरोनाबाधित तीन रूग्णांपैकी एक शहरातील मोठा माळी वाडा तर दुसरा बालाजी मंदीर परिसरातील आहे. परंतू तिसरा रूग्णाचा पत्ता माहित नसल्यामुळे यंत्रणेची धावपळ उडत होती. तब्बल दोन तासाच्या चौकशी नंतर बाधित महिलेचा पत्ता सापडला. कोरोना बाधित महिला तालुक्यातील चोरगाव येथील असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. दरम्यान, धरणगावात याआधी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. तर शहरात दोन दिवसापूर्वीही तीन रुग्ण आढळले होते. दरम्यान, धरणगाव तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे यंत्रणेची मोठी धावपळ उडाली आहे.

Protected Content