जळगाव जिल्ह्यात आणखी पाच कोरोना बाधित रूग्ण आढळले

 

जळगाव (प्रतिनिधी)  जिल्ह्यातील स्वॅब घेतलेल्या 46 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 41 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून पाच व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. . दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या आता ९० झाली आहे.

 

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भुसावळ येथील एक 60 वर्षीय पुरूष, कांचननगर, जळगाव येथील 35 वर्षीय महिला, तर पाचोरा येथील 44 व 53 वर्षीय पुरूष व 20 वर्षीय महिला अशा तीन व्यक्तींचा समावेश आहे. यात भुसावळ येथील रूग्ण हा ६० वर्षाचा गृहस्थ असून तो जाम मोहल्ल्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. निगेटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये पाचोरा येथील 19 व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 90 इतकी झाली असून त्यापैकी १४  रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content