पहूर बसस्थानकाजवळील हॉटेलमध्ये चोरी ; ४१ हजारांचा ऐवज लंपास

 

पहूर, ता . जामनेर, प्रतिनिधी । बसस्थानक परिसरात पोलीस चौकीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या बालाजी रेस्टारंट या हॉटेलमधून पहाटे चोरट्यांनी ४१ हजारांचा ऐवज लंपास केला.

सध्या लॉक डाऊन असल्याने गेल्या दिड महिन्यांपासून हॉटेल बंद आहे . हे हॉटेल आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास फोडल्याचे उघडकीस आले . याबाबत फिर्यादी श्यामकांत पंडित सोनार यांनी पहूर पोलीसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आमचा वडिलोपार्जित हॉटेल व्यवसाय असून माझ्या आजोबांनी सदर हॉटेलची जागा गावातीलच इसामोद्धिन अब्दूल समद यांच्याकडून भाड्याने घेतले आहे . आज सकाळी माझा भाऊ शरद सोनार व मी शेताकडून घराकडे येत असता हॉटेल समोर आम्हाला चारचाकी गाडी उभी दिसली . हॉटेलजवळ आम्ही गेलो असता आम्हाला पाहून गाडी वेगात निघून गेली . त्या गाडीचा नंबरही आम्हाला पाहता आला नाही . म्हणून आम्ही दोघे जण हॉटेलात गेलो असता १५ हजारांचे फ्रिज , १ ५ हजारांचे डिव्हीआर यंत्रणा , तीन हजारांचा इलेक्ट्रीक वजन काटा , ३ हजारांचे विजेचे मिटर, तसेच ५ हजारांचे कढई, झारे , प्लेटस व हॉटेलचे नांव असलेले फलक असा ४१ हजारांचा ऐवज लंपास झाल्याचे उघडकीस आले. त्या ठिकाणी शेख इजाजोदिन शेख अब्दूल समद होटेल जवळ दिसले. त्यांना विचारले असता ते उडवाउडवीची उत्तरे दिले. याचा अर्थ वरील चोरी त्यांनीच केल्याचे स्पष्ट होते. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध पहूर पोलीस ठाण्यात भाग ५नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनी राकेश सिंग परदेशी करीत आहेत .

Protected Content