महाराष्ट्राचा लसीकरणात महाविक्रम

मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्याने आज लसीकरणाचा नवीन विक्रम करत एकाच दिवशी १२ लाखांपेक्षा जास्त लसी दिल्या आहेत.

२१ ऑगस्ट रोजी राज्यात एकाच दिवशी ११ लाख ४ हजार ४६४ नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने आतापर्यंतची सर्वाधिक संख्या नोंदविली होती. आज (दि. ४ सप्टेंबर) झालेल्या लसीकरण सत्रांमध्ये सायंकाळी आठ वाजेपर्यंत १२ लाखांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण झाले आहे,. या आकडेवारीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. लसीकरण कार्यक्रमातील हा आजपर्यंतचा विक्रम असून आरोग्य यंत्रणेतील सर्व घटकांच्या परिश्रमाचे हे फलित आहे, असे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण सव्वासहा कोटींच्या वर लस मात्रा देण्यात आल्या असून त्यात दुसर्‍या लसीची मात्रा देण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. कोविड प्रतिबंधक लसीकरणाच्या आज जारी केलेल्या एकत्रित अहवालानुसार महाराष्ट्रात १ कोटी ७१ लाख जणांना दुसर्‍या लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!