यावल येथील बालाजी रथोत्सव रद्द

यावल प्रतिनिधी । येथील सालाबादप्रमाणे उद्या २७ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी सुमारे ११५ वर्षांची परंपरा असलेला बालाजी रथोत्तसव कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर सलग दुसऱ्‍या वर्षीही खंडीत होत असल्याने तालुक्यातील श्रद्धालु भाविक आणि शहरवासीयांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

हनुमान जयंती म्हटली की यावल शहरवासीयांच्या आनंदाची पर्वणीच या दिवशी श्रीबालाजी महाराजांचा रथारेत्सवाची शहरात यात्रा असते या परंपरेस सुमारे ११५ वर्षाचा इतिहास आहे. गेल्या वर्षीही कोरोना संचारबंदी असल्याने कारणाने प्रथमचही परंपरा खंडीत झाली होती मात्र यावर्षी पुन्हा कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने संचारबंदी जाहीर केल्याने पुन्हा ही परंपरा दुस-या वर्षी खंडीत होत आहे. रथोत्सव समीतीचे अध्यक्ष चंद्रकात देशमुख यांनी कोरोनाच्या पार्श्श्वभुमीवर ही रथयात्रा रद्द होत असल्याचे सांगुन मंगळवारी सकाळी आठ वाजेला मोजक्याच नागरिकांच्या उपस्थीतीत श्रीबालाजी महाराजांची पुजा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हनुमान जयंतीवर उत्सवावरही विरजन शहरात हनुमान जयंतीही मोठया उत्सवात साजरी केली या दिवशी शहरातील सर्व मंदिरावर महापुजा व भंडा-याचे आयोजन असते मात्र कोरोना पार्श्वभुमीवर सलग दुस-या वर्षी ही हनुमान जयंतीचा सार्वजनिक उत्सव रद्य होत आहे. या निमित्ताने ओढल्या जाणाऱ्या बारा गाडयांचे ही सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.

 

Protected Content