लोकशाही दिन ऑनलाइन होणार

 

जळगाव, प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लोकशाही दिन नवीन वर्षात व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील लोकशाही दिनाचे सोमवार ४ जानेवारी २०२१ रोजी आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकशाही दिन व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेण्यात येईल. या दिवशी तक्रारदारांनी संबधित तहसील कार्यलयात हजर राहून तक्रार सादर करव्यात असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी केले आहे.

Protected Content