अरे बापरे….भुसावळच्या बाजारपेठ स्थानकातील आठ पोलीस कर्मचारी कोरोना बाधीत !

भुसावळ प्रतिनिधी । शहरातल्या बाजारपेठ पोलीस स्थानकातील आठ कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती रात्री उशीरा समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

भुसावळ शहरात कोरोनाचा संसर्ग विलक्षण वेगाने वाढू लागला आहे. सोमवारी दुपारी शहरातील चार रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले होते. यातील एक तर रात्री उशीरा आलेले सात असे एकूण आठ कोरोना बाधीत हे बाजारपेठ पोलीस स्थानकाचे कर्मचारी आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पोलीसांना कोरोनाची बाधा झालेली असली तरी इतक्या प्रमाणात पहिल्यांदाच बाधा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बाजारपेठ पोलीस स्थानकातील दोन कर्मचार्‍यांना आधीच कोरोनाची बाधा झाली होती. तर अलीकडेच एक पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यूदेखील झाला होता. या पार्श्‍वभूमिवर, एकाच पोलीस ठाण्यातील आठ कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

दरम्यान, सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास या आठही कर्मचार्‍यांना रेल्वेच्या कोविड रूग्णालयात दाखल करण्यात आले. येथील नगरसेवक निर्मल उर्फ पिंटू कोठारी यांनी रात्रीच त्यांच्यासाठी अकरा आयुर्वेदीक घटकांचा समावेश असणारा काढा आणला. तर रेल्वे रूग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत.

Protected Content