भुसावळ रेल्वे मंडळ येथे प्रजासत्ताक दिन साजरा

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ येथील रेल्वे मंडळ कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भुसावळ मंडळ रेल प्रबंधक येथे पांडे यांच्या शुभ हस्ते रेल्वे क्रीडांगण मध्ये झेंडा वंदन करण्यात आले. यावेळी रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी झेंडाला वंदन करून सलामी दिली आणि रेल्वे सुरक्षाबल कर्मचाऱ्यांनी परेडला सुरुवात करण्यात आली.
या परेड मध्ये सशस्त्र, निशस्त्र, तथा रेल सुरक्षा बलाची तीन तुकडी, रेल्वे स्कूलचे विदयार्थी,
स्काऊट तथा गाईड यांच्या द्वारे परेड करण्यात आली. आणि परेडचे विसर्जन करण्यात आले. विद्यार्थी गांधीजी, चाचा नेहरू, मदर टेरेसा, सुभाषचंद्र बोस असे वेशभूषा परिधान करून आले होते. यादरम्यान डॉग शो चेही आयोजन करण्यात आले होते. मंडळ रेल प्रबंधक इती पांडे यांनी रेल कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि महाप्रबंधक यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला. याप्रसंगी अप्पर मंडळ रेल प्रबंधक आणि सर्व विभागाचे आणि सर्व शाखांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मंडळ रेल प्रबंधक द्वारा रेल्वे सुरक्षा बलाचे जवानांना मेडल देऊन सन्मान करण्यात आले

Protected Content