बियाणी पब्लीक स्कुल मध्ये वार्षिक पारितोषीक वितरण.

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बियाणी इंग्रजी व मराठी माध्यम स्कूल, तसेच कॉलेज च्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला.

बियाणी स्कूल इंग्रजी व मराठी माध्यम तसेच कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ दि १९ रोजी उत्साहात पार पडला. त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोज बियाणी (अध्यक्ष राष्ट्रीय शिक्षा समिती) उपस्थित होते. तसेच डॉ.संगीता बियाणी (सेक्रेटरी राष्ट्रीय शिक्षा समिती) , जितेंद्र पाटील (प्रांताधिकारी भुसावळ), अंगद असतकर (नायब तहसीलदार भुसावळ), राजेश पारिख, प्रवीण भराडिया, गोपाळ ठाकूर, बियाणी मिलीटरी स्कूलचे प्रिंसिपल डी. एम. पाटील, बियाणी पब्लीक स्कुलचे प्रिंसीपल रुद्रसेन गंठिया यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या विद्यार्थीनींनी स्वागत गीत प्रस्तुत केले. वेगवेगळ्या स्पर्धा तसेच मागील शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके व शिल्ड,प्रमाणपत्र देण्यात आली. प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत सहभागी होण्याविषयी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्याविषयी, संस्कृती जपण्याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. आभार प्रिंसीपल रुद्रसेन गंठिया यांनी मानले.

Protected Content