देवगांव-देवळी जिल्हा परीषद शाळेत विज्ञानाविषयी जनजागृती

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ‘मिल के चलो असोसिएशन’ आणि मारवड विकास मंच अंतर्गत डॉ कलाम फिरती प्रयोगशाळा हा उपक्रम अमळनेर तालुक्यात सुरू आहे.. हा उपक्रम मारवडचे विकासरत्न संदीप साळुंखे आयुक्त नागपूर यांच्या संकल्पनेतून व मिल के चलो हया संस्थेचे प्रमुख अनिरुद्ध पाटील यांच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू आहे.

देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल येथील विद्यार्थी व जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा देवळी येथे संपन्न झाला…
व्यासपीठावर अनिरुद्ध पाटील, चेतन वैराळे ,दिनेश पाटील, अनिल पाटील, देवगाव देवळी हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक आय आर महाजन, एच ओ माळी,देवळी जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक अरविंद सोनवणे शिक्षक-रमेश पाटील, जितेंद्र शेटे, दिपक सोनवणे, रेखा सोनवणे उपस्थित होते.

अगोदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक देवगाव देवळी हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी केले.. कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मिलके चलो असोसिएशन व मारवाडी विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प सुरू असून डॉक्टर कलाम फिरती प्रयोगशाळेच्या माध्यमातून अमळनेर तालुक्यातील 20 शाळांची निवड करण्यात आली आहे ..त्यात शहरी भागातील 3, व ग्रामीण भागातील 17 शाळांची निवड करण्यात आली आहे.

डॉक्टर कलाम फिरती प्रयोगशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची जनजागृती करणे, विद्यार्थ्यांची पूर्व चाचणी घेऊन त्यांची उत्तर चाचणी घेणे विद्यार्थ्यांना या फिरत्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून मिल के चलो असोसिएशनचे प्रमुख अनिरुद्ध पाटील यांनी विज्ञानातील विविध संकल्पना स्पष्ट करत विद्यार्थ्यांना विज्ञानाविषयी गोडी निर्माण केली.

मिसाईल मॅन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांचे शैक्षणिक व सामाजिक जीवनातील अनेक पैलू त्यांनी उलगडत विद्यार्थ्यांना बोलके केले. चेतन वैराळे, दिनेश पाटील ,अनिल पाटील यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या संदर्भातील विविध संकल्पना सांगितल्या.. नंतर शेवटच्या टप्प्यात विद्यार्थ्यांना किती समजले यावर त्यांचे मनोगत घेण्यात आले. मिल के चलो असोसिएशनचे प्रमुख अनुरुद्ध पाटील यांनी मुख्याध्यापक शिक्षक व यांचे धन्यवाद व्यक्त केले.। शेवटी आभार जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अरविंद सोनवणे यांनी मानले. यावेळी देवगाव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूलचे आठवी ,नववी ,दहावीचे विद्यार्थी व जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Protected Content