माळी समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील संत सावता माळी समाज सुधारणा पंचमंडळ मोठा माळीवाडा धरणगाव यांच्या वतीने माळी समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

माळी समाजाच्या जनरल सभेचे आयोजन केले होते. यामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली आणि माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये तिरंगा अकॅडमीचे प्रमुख समाधान महाजन, केद्रप्रुमुख श्री , ज्ञानेश्वर तुकाराम माळी यांची कन्या जोत्सना माळी, प.रा.विद्यालयाचे उपशिक्षक पी.डी.महाजन यांची कन्या स्नेहल महाजन यांचा समावेश आहे.

माळी समाजाच्या मान्यवरांनी आमचा सन्मान केला, आमची जबाबदारी वाढली व शाबासकीची – कौतुकाची थाप व आशिर्वाद आम्हाला नेहमी ऊर्जा देतील असे प्रतिपादन समाधान महाजन यांनी केले. याप्रसंगी माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा महाजन, रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष निंबाजी सदू महाजन, शिवाजी देशमुख, सहसचिव दिगंबर महाजन, विश्वस्त ज्ञानेश्वर भादू महाजन, विजय धनलाल महाजन, माजी सचिव दशरथ झेंडू महाजन, रामनाथ माळी, भगवान तायडे, भैय्या महाजन, विलास रामा माळी, पत्रकार रवि महाजन, भिका माळी, कांतीलाल माळी, राजु बापु माळी समाजातील जेष्ठ मान्यवर सुखदेव दयाराम महाजन, रावा महाजन, संजय महाजन, महेंद्र महाजन, पी.डी.पाटील, दिनेश महाजन, कैलास महाजन, तसेच माळी समाजातील सर्व सन्माननीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जनरल सभेचे सूत्रसंचलन माळी समाजाचे कोषाध्यक्ष व्ही.टी.माळी तर आभार माळी समाजाचे सचिव गोपाल भास्कर माळी यांनी केले.

Protected Content