Home धर्म-समाज भारतीय राष्ट्रीय युवा परिषद तर्फे शहीद जवानांच्या मातापित्यांचा गौरव

भारतीय राष्ट्रीय युवा परिषद तर्फे शहीद जवानांच्या मातापित्यांचा गौरव

0
48


भडगाव प्रतिनिधी । भारतीय राष्ट्रीय युवा परिषदतर्फे ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भडगाव तालुक्यातील शहीद जवानांच्या मातापिता यांना नुकतेचे सन्मानित करण्यात आले आहे.

“व्हावे जीवन यज्ञ समर्पण”, “धन्य ते माता धन्य ते पिता” या उक्तीप्रमाणे भडगाव शहरातील शहीद विर जवान यांच्या माता पिता याचा सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेले शहीद वीर जवान निलेश सोनवणे, सुनिल हिरे, बाळासाहेब पाटील, विवेक पाटील या शहीद जवानांनच्या घरी जाऊन त्यांचा माता पिताना सन्मानित केले. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष दिव्या भोसले, जिल्हा समन्वयक स्वप्निल निकम, नेहा मालपुरे, तालुकाध्यक्ष प्रतिक पाटील, सचिव अश्विनी सोमवंशी, कृष्णा भोसले, कोषाध्यक्ष अमोल पाटील, प्रतिक्षा सोनवणे, समन्वयक प्रेरणा पाटील, दर्शना गोसावी, यश शिंपी, अर्जुन पवार, प्रतिक्षा ततार हे उपस्थित होते तसेच निधी टिकारामसिंग पाटील या विद्यार्थीनीचा एनटीएस परिक्षेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल तिचे व तिच्या आईवडिलांचा सन्मान करण्यात आला.

 


Protected Content

Play sound