चिंचोली येथील महिला कोरोना पॉझिटीव्ह

यावल प्रतिनिधी । चिंचोली येथील एक महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आज निष्पन्न झाले असून यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधीतांची रूग्ण संख्या २५ वर पोहचली आहे.

कोरोना संसर्गाचे महामारीच्या संकटाने मोठया वेगाने शिरकाव केला असुन आता या आजाराने ग्रामीण परिसरातील देखील आपला प्रादुर्भाव वाढवलेला असल्याचे दिसुन येत आहे. यात आज चिंचोली गावातील एका ३८ वर्षीय महीलेचा कोरोना चाचणी अहवाल हा पॉझीटीव्ह आला आहे. किनगाव प्राथमिक आरोग्य केन्द्राअंतर्गत येणार्‍या चिंचोली गावात आज एक महिला पॉझिटीव्ह आढळून आल्याची माहिती मिळताच आरोग्य अधिकारी डॉ. मानिषा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य पथकाने आज या गावातील १५० कुटुंबांतील ६८५ नागरीकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. पॉझीटीव्ह आलेल्या महिलेच्या निवासस्थान हे निर्जतुकीकरण करून संपुर्ण परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन सील करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे. दरम्यान गावातील नागरीकांनी घरातच रहावे सुरक्षीत रहावे असे आवाहन तहसीलदार जितेन्द्र कुवर, पोलीस निरिक्षक अरुण धनवडे, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ मानिषा महाजन व ग्राम पंचायत प्रशासनाने केली आहे. दरम्यान, चिंचोली येथील महिला पॉझिटीव्ह आल्यामुळे यावल तालुक्यात एकुण कोरोना बाधितांची संख्या आता २५वर पहोचली आहे.

Protected Content