किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत हिवताप जनजागृती व निर्मुलन मोहीमेस प्रारंभ

यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनीधी | तालुक्यातील किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या नायगाव उपकेंद्र आणि मालोद उपकेंद्र येथे हिवताप जनजागृती मोहिमेला प्रारंभ करण्यात आला आहे.

 

आगामी २५ एप्रिल रोजी जागतीक हिवताप दिन असल्याने संपूर्ण एप्रिल महिना आरोग्य विभागातर्फे हिवताप जनजागृती महिना साजरा करण्यात येणार आहे. यानुसार उपकेंद्र नायगांव, मालोद आणि किनगाव येथे हि मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंत गप्पी मासे सोडणे,खोल खड्डे बुजविने,पाण्याच्या टाक्या, हौद, कुलर टाकाउ जुने टायर,डास अळीसाठी कंटेनर सर्वेक्षण करणे, गटारी वाहत्या करणे, हिवताप व आरोग्य विषयी म्हणी लिहिणे,आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.देवराम लांडे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ हेमन्त बऱ्हाटे व किनगाव आणि साकळी प्राथमिक आरोग्य केंन्द्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा महाजन आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती कवडीवाले, हिवताप पर्यवेक्षक विजय नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवक विठ्ठल भिसे, दिपंकर बरडे,मनोज बारेला हे या मोहीमेला किनगाव आरोग्य केन्द्राअंतर्गत येणाऱ्या गावांना घरोघरी जावून हिवताप मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

Protected Content