वृत्तपत्र विक्रेत्यांच्या अडचणी सोडवा : तापी पूर्णा वृत्तपत्र विक्रेता संघटनेची मागणी

यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | वृत्तपत्रे लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ म्हणून गणले गेले आहे. समाज व देश बळकट करण्याचे काम खऱ्या अर्थाने हा स्तंभ करीत असतो. या स्तंभाचा पाया जर मजबूत असेल तर त्याचे कार्य सुरळीत चालू शकते. आणि हाच पाया आहे वृत्तपत्र विक्रेते बांधव. त्यांना असणाऱ्या विविध समस्या सोडवण्याची मागणी सर्व दैनिकांच्या कार्यलयात संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.

 

तापी पूर्णा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत. यात वृत्तपत्र विक्रेता बांधवांना विमा कवच आरोग्य आणि अपघात विमा सुविधा मिळाव्यात. महागाईचा विचार करुन आधारभुत कमिशन मिळावे. डिपॉझीट रक्कम वर व्याज मिळाव. या वेळी लोकमत कार्यालय, दिव्य मराठी कार्यालय, सकाळ कार्यालय, पुण्य नगरी कार्यालय व देशदूत कार्यालय या कार्याल यांना भेट देऊन निवेदन देण्यात आले. त्यांना विनंती करण्यात आली की, आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे जेणेकरून वृत्तपत्र विक्रेता बळकट व सशक्त होईल. याप्रसंगी निवेदन देण्याकरिता महाराष्ट्र वृत्तपत्र विक्रेता संंघटना जळगाव उपाध्ययक्ष गोपाल चौधरी, तापी पूर्णा वृत्तपत्र विक्रेता संंघटना अध्यक्ष संजय निंंबाळकर वरणगाव, संघटना सचिव गणेश पाटील उटखेडा, सदस्य प्रल्हाद महाजन बलवाडी, कमलाकर माळी मोठे वाघोदा, विनोद सैतवाल चिनावल, नितिन बाणाईत सांगवी, महेश वाणी यावल, सुनिल सोनी जामनेर, उज्वल मराठे तळवेल, श्रीकांत कुलकर्णी भुसावळ, अमोल साबळे भुसावळ, अजिंक्य वाणी रावेर, विकास पाटील सावदा, प्रमोद पाटील सावखेडा आदी उपस्थिती होते.

Protected Content