निराधार महिलेवर नगरसेवक येवलेंच्या पुढाकाराने अंत्यसंस्कार

यावल प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगरातील रहीवासी निराधार गंगुबाई शेनफडू महाडीक (वय ७५) या वृध्द महिलेचे आज गुरूवारी वृध्दापकाळाने दुपारी निधन झाले. सदर या वृध्देमहीलेच्या पश्चात कुटुंबात कोणीही नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे यावल तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक मुकेश येवले यांचेसह छत्रपती शिवाजी मित्र मंडळाच्या कार्यकर्ते यांच्यातर्फे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

मंडळाचे कार्यकर्ते डॉ. हेमत येवले, बापु जासुद, प्रकाश सुर्यवंशी, योगेश वाणी, गणेश् कोल्हे, मोहन भगत, पंकज रोहम, श्रीरंग वाघ, शहाजी येवले, नितीन चव्हान, शशी यादव, गोपाळ मेंढरे, राजु भोईटे, कैलास आलोणे, विकास येवले, राजु भोईटे, कैलास आलोणे, विलास येवले, चंद्रकांत येवले, शशी रोहम, अशोक येवले, गोपाल काकडे, सागर सुर्यवंशी विलास कदम, संजय चव्हाण  यांनी या निराधार महीलेच्या अंत्यसंस्कार साठी  माणुसकी दर्शन घडवित आयुष्य निराधार म्हणून जगली पण त्या वृद्धेच्या जिवनाचा शेवट मात्र तिच्या कुटुंबा प्रमाणेच करण्यात आले, प्रा . मुकेश येवले व छत्रपती शिवाजी मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत.

Protected Content